ग्रामदेवतेने दिला कौल
आचरा–अर्जुन बापर्डेकर,
बहुचर्चित असलेली चिंदर गावची गावपळण बुधवार २डिसेंबर पासून सुरू होत आहे. बुधवारी दुपारी ग्रामदेवता रवळनाथाने कौल दिल्याने चिंदर गावची गावपळण २डिसेंबर पासून होणार असल्याची माहिती चिंदरगावचे मानकरी दिनेश पाताडे यांनी दिली.सुमारे चार ते पाच हजार वस्तीच्या या गावात प्राचीन काळापासून दर तीन ते पाच वर्षांनी गावपळणीची प्रथा पाळली जात आहे.मागिल काळात २०२२साली गावपळण झाली होती.यंदाचे वर्ष गावपळणीचे असल्याने प्रथेप्रमाणे बुधवारी दुपारी बारापाच मानकरी जमून श्री देव रवळनाथाला कौल प्रसाद घेतला.देवाचा कौल झाल्यावर तारीख निश्चित करण्यातआली.यामुळे २ते५डिसेंबर पर्यंत संपूर्ण चिंदर गावांतील माणसे तीन दिवस आणि तीन रात्री साठी वेशीबाहेर निसर्गाच्या सानिध्यात वस्ती करून राहणार आहेत.त्यामुळे संपूर्ण चिंदर गाव निर्मनुष्य होणार असल्याची माहिती मानकरी दिनेश पाताडे यांनी दिली.यामुळे या काळात गजबज वाढणार आहे ती गावच्या वशीबाहेर.यासाठी मुंबई चाकरमानी ही मोठ्या संख्येने या पळणीत सहभागी होण्यासाठी येतात. यासाठी आता वेशीबाहेर राहुट्या उभारण्यासाठी,गावपळणीची तयारी करण्यात चिंदर ग्रामस्थांची लगबग वाढणार आहे.













