मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री हा ई-मेल महापौर कार्यालयासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.या ई-मेलमध्ये महापौर कार्यालयात दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील मेट्रो स्थानकांवर आयईडी स्फोट घडवण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ या निवासस्थानाचाही धमकीच्या संदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.
याशिवाय गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमालाही यापूर्वी धमकी देण्यात आली होती. ई-मेलमध्ये खलिस्तान आणि ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’चा उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान, या धमकीच्या पार्श्वभूमीवर महापौर कार्यालय, मेट्रो स्थानके आणि इतर संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.












