माखजन इंग्लिश स्कूल येथे संविधान दिन

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड.पी.आर.नामजोशी कला.वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महादेव परब होते.
सिद्धी पांचाळ,आराध्या सप्तीसकर,अदिती कातकर,कल्याणी साठे या मुलींनी संविधान दिनानिमित्त मनोगते व्यक्त केली.तर शिक्षक सचिन कदम यांनी संविधान दिन साजरा करण्या मागचा उद्देश कथन केला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीत दिलेल्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले.
यानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अमृता धामणाक,ईशा जुवळे,हंसिका कुळये,प्राची हेमण,आदी विद्यार्थिनीनी रांगोळ्या रेखाटल्या.कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक महादेव परब यांनी आपले विचार मांडले.तर आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले.
यावेळी मानसी कोवळे,रुही पाटणकर,हर्षदा कदम,महादेव शिंदे,विठ्ठल भोईर,चंद्रकांत चाचे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा गौरव पोंक्षे याने केले.