वैभववाडी भाजपा कार्यालयात संविधान दिन साजरा

वैभववाडी प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीच्या वैभववाडी येथील पक्ष कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वैभववाडीच्या नगराध्यक्ष सौ. श्रद्धा रावराणे, सौ. प्राची तावडे, प्रदीप रावराणे, दिगंबर पाटील, शिवाजी राणे, रणजीत तावडे, आशिष रावराणे, रोहन रावराणे, मंदार रावराणे, गणेश पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.