गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील,परशुराम युवा मंच माखजन आरवली दशक्रोशी तर्फे गांडूळखत निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.हे प्रशिक्षण ७ डिसेंबर रोजी आरवली येथे प्रसन्न लघाटे यांचे निवास्थानी,आरवली ब्राह्मण वाडी येथे सकाळी १० वाजता येणार आहे.
दशक्रोशीतील शेतकऱ्यांना गांडूळखत निर्मितीतून रोजगार उपलब्ध व्हावा तसेच स्वतःच्या शेतीसाठी घरच्या घरी गांडूळखत बनवता यावं यासाठी परशुराम युवा मंचातर्फे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे युवा मंचाचे अध्यक्ष कुलदीप भागवत यांनी सांगितले.हे प्रशिक्षण देण्यासाठी मेर्वी येथील श्री जयंत फडके उपस्थित राहणार आहेत.माखजन आरवली दशक्रोशीत भातपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.शिवाय गडनदी च्या पाण्यावर रब्बी पिके देखील घेतली जातात.गावागावात पावटा,कडवा,कुळीथ,चवळी आदींचे पिक घेणारे असंख्य शेतकरी आहेत.त्यामुळे गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे.













