पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न ..

मंडणगड | प्रतिनिधी : पणदेरी पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी येथे शासनाच्या वतीने हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मृती प्रित्यर्थ 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.इंगळे सर यांनी केले. सुरुवातीला सर्वांचे शाब्दिक स्वागत करण्यात आले.आजच्या दिवसाचे महत्त्व प्रशालेचे शिक्षक श्री. वाकचौरे सर यांनी मेजर ध्यानचंद यांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला.तसेच क्रीडा क्षेत्रात पुढे जाता येते याविषयी मार्गदर्शन केले.त्या नंतर प्रमुख पाहुणे श्री. शेले सर, प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. सूर्यवंशी सर, प्रभारी श्री.गवारी सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे अतिशय उत्साहात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला या वेळी लिपिक श्री पालकर भाऊ, शिपाई हीलम भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.