उत्कर्ष कोकण सेवा संघ, कृषि महाविद्यालय, दापोलीतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

दापोली l प्रतिनिधी: उत्कर्ष कोकण सेवा संघ, कृषि महाविद्यालय, दापोली यांच्यातर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंना वंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषि महाविद्यालय, दापोलीचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजयकुमार तोरणे, कृषि विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर, कृषि महाविद्यालयाचे सांस्कृतिक सल्लागार डॉ. उदयकुमार पेठे, सहाय्यक कुलसचिव श्री. अजित जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

 

त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या हस्तलिखित शुभेच्छा असणार पोस्ट कार्ड आणि पुष्प देऊन सर्व उपस्थित गुरुवर्यांना वंदन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या पुढील भागात गुरुबंद्दलचे प्रेम, आदर आणि गुरुचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्व याच प्रतिबिंब असलेली मनोगते मंदार पाटील, मिहीर जाधव, ज्ञानेश पाटील, सोहम सोनावणे, संकेत देसाई आणि जीवेश देशमुख यांनी व्यक्त केली.

 

यावेळी उपस्थित प्राध्यापक डॉ. उदयकुमार पेठे, डॉ. वैभव राजेमहाडिक, डॉ. संतोष वरवडेकर, डॉ. संजयकुमार तोरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

प्रमुख पाहुणे डॉ. प्रमोद सावंत यांनी हा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी गुरूंनी त्यांना दिलेला वसा पुढे चालू ठेवण्याचे आणि गुरूंचा संदेश प्रत्यक्षात आचारण्याचे आवाहन केले. उत्कर्ष कोकण सेवा संघ यावर्षी रौप्य महोत्सव साजरा करत असल्याने त्यांना शुभेच्छाही दिल्या.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांसाठी प्रश्न मंजुषा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांसमोर अनेक प्रश्न असलेल्या चिठ्या ठेवल्या होत्या. त्यातून प्रत्येक प्राध्यापकाने एक प्रश्न निवडला आणि त्याचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांसमोर दिले. या उपक्रमाने कार्यक्रमामध्ये थोडी गंमत आणली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वेश सावंत, साक्षी लोके, अंकिता मुंज आणि जीवेश देशमुख यांनी केले तर सर्वेश सावंत यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी यांचे आभार मानले.कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. रमेश कुणकेरकर आणि उत्कर्ष कोकण सेवा संघाचे संस्थापक मार्गदशक डॉ. विठ्ठल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यन सासे, अथर्व शिंदे, मिहीर जाधव, मनिष वालनकर, मयूर वळवी, गौरव पवार, रोहन वारंग, मंदार पाटील, शुभम रसाळ, स्वरूप मोरे, हर्ष महाडिक, ओम थुळ, आदित्य दळवी, विनया सुपे आणि आकांक्षा मेश्राम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.