कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा – ३ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा- किशोर शिंदे यांची मागणी

संतोष कुळे l चिपळूण :  तालुक्यातील कोळकेवाडी, अलोरे, पेढांबे, पिंपळी – बुद्रुक खुर्द, नागावे, पोफळी,

कुंभार्ली गावातील कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा ३ चे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत विभागीय आयुक्त कोकण विभाग पुनर्वसन समितीचे अशासकीय निमंत्रित सदस्य व प्रकल्पग्रस्थ संघटनेचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी दि. १६ जुलै रोजी झालेल्या व्ही सी द्वारे बैठकीत प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली आहे.

सदरच्या व्ही सी बैठकीत त्यांनी कोळकेवाडी येथील उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांचे वतीने १५/०७/२०१९ रोजी झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे संकलन यादीद्वारे झालेल्या वाचना प्रमाणे सुधारित प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात यावा.

नागावे, अलोरे, पेढांबे, पिंपळी बुद्रुक / खुर्द तसेच कुंभार्ली, पोफळी, कोंडफणसवणे येथील प्रकल्पग्रस्तांचे संकलन यादी प्रमाणे चावडी वाचन करून, तसा अहवाल (गाव निहाय) शासनास सादर करणे.

निर्वाह भत्ता देणे,

महाजानको विद्युत केंद्र संकुल फोफळी येथील प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्थ उमेदवारांना सेवेत कायम करणे,

प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जागा देणे अथवा प्रचलित दराने आर्थिक मोबदला देणे, प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रकल्पग्रस्त दाखल्याचे आधारे शासकीय / निमशासकीय विभागात पात्रते प्रमाणे नोकरी देणे, अथवा ४० लक्ष रुपये आर्थिक मोबदला देणे,

बोलाडवाडी पश्चिम हसरेवाडी येथील पर्जन्य वृष्टी प्रकल्पग्रस्तांचे नागवे येथील स. न. १३ या प्रकल्पाच्या मोकळ्या पडीक जागेत शासनाच्या वतीने घरे बांधून पुनर्वसन करणे.

या सर्व मागण्याबाबत किशोर शिंदे यांनी या बैठकीत मुद्दे केले. यावर चर्चा घडवून आणली आहे. त्या अनुषंगाने कोकण आयुक्त पुनर्वसन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी पुढील योग्य कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आला आहेत. कोयना जल विद्युत प्रकल्प टप्पा -३ चे प्रकंपग्रस्तांचे दीर्घकालीन दुर्लक्षित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने

विभागीय आयुक्त कोकण विभाग पुनर्वसन समितीचे अशासकीय निमंत्रित सदस्य व प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष किशोर शिंदे, कार्याध्यक्ष सदाशिव बैकर , सरपंच सौ. पल्लवी, उपाध्यक्ष लक्ष्मण कदम , सीताराम जागड्ये, सचिव दत्ताराम वीर, सचिन राणे ,सदस्य प्रमोद चव्हाण , शिवाजी पांडे

हे प्रयत्न करत आहेत.