माखजन |वार्ताहर : शेतकरी लोकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे या साठी शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या , ग्रामीण कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत कृषी कन्या मार्फत सेंद्रिय कीटकनाशक निर्मिती (दशपर्णी अर्क) तसेच अजून इतर सेंद्रिय पदार्थांचे महत्व व निर्मिती या बाबत आंबव पोंक्षे येथे माहिती देण्यात आली.
या मध्ये कु. आकांक्षा गायकवाड, कु. अरोही मालवणकर, कु. सोनाली काळे, कु.साक्षी कोळी, कु. पूर्वा चव्हाण यांचा सहभाग होता.
या उपक्रमासाठी आंबव पोंक्षे गावचे सरपंच मा. शेखर उकर्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कामसाठी मा. प्राचार्य सुमितकुमार पाटील सर तसेच एम.एन .पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले












