मालवण | प्रतिनिधी : अ. शि. दे टोपीवाला हायस्कुल मालवण येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे दिवसभराचे कामकाज शिक्षक, शिपाई, लेखनिक तसेच इतर कामे ९० विध्यार्थ्यांनी (जम्बो शिक्षण मंडळाने) यशस्वीपणे पार पाडली.
शिक्षक दिनानिमित्त प्रशालेचे एकदिवसीय मुख्याध्यापक अर्थ कुशे, उपमुख्याध्यापक गौरवी मांजरेकर, उपमुख्याध्यापक दिप कोकरे, पर्यवेक्षक शिला वलकर व पर्यवेक्षक दिप्ती शिंदे यांनी आपापल्या पदाला साजेसे काम केले. दिवसभर विध्यार्थी – शिक्षकांनी सर्व तासिका नेहमीच्या शिक्षकांप्रमाणे घेतल्या. ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून मतिष मयेकर आणि उपमुख्याध्यापक मयुरेश फाटक यांनी काम पाहिले. अनेक शाळाना अपुऱ्या शिक्षकांची समस्या भेडसावत असताना त्यावर उपाय म्हणून एक दिवसाचे जम्बो शिक्षक मंडळ फारच नाविन्यपूर्ण ठरते. या उपक्रमाचे नियोजन प्रशालेचे पर्यवेक्षक सुभाष प्रभुखानोलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सतीश बनसोडे, महेश धामापूरकर, देविदास वेरलकर, सौ. ज्योती तोरसकर, मिलिंद शिरोडकर व इतर शिक्षकांनी काम पाहिले.
समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय जोशी सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. जी. सामंत सर उपस्थित होते. या सर्वांनी विध्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुग्धा गवाणकर हिने केले तर आभार कु. आर्यन प्रभुगावकर याने मानले.











