संतोष कानडे, राजाराम धुरी यांचा उद्या इन्सुलीत नागरी सत्कार

बांदा (प्रतिनिधी) :  सावंतवाडी तालुक्यातील भजनी कलावंतांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष कानडे व सदस्य राजाराम धुरी यांचा बुधवार १३ सप्टेंबर रोजी भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. इन्सुली आरटीओ चेकनाका येथील श्री गणपती मंदिरात सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. तालुक्यातील पारंपरिक भजनी मंडळे, भजनी बुवा, पखवाजवादक, तबलावादक व कोरस यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.