रत्नागिरी : भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा आघाडीची बैठक पार पडली.
यावेळी महिला सक्षमीकरण करणे. त्याचसोबत बूथ सक्षमीकरण करण्यावर भर देण्याबाबत प्रमोद जठार , अतुळ काळसेकर व बाळ माने यांनी मार्गदर्शन केले.
अंत्योदयाचं उद्दिष्ट ठेवत देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत.
मोदीनी जनतेसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा घराघरात प्रचार प्रसार करणे बाबत सूचना केल्या.
यावेळी ऐश्वर्याताई जठार, सुजाता साळवी, दिपिकाताई जोशी, शिवानी सावंत, समिधा पोकडे, शोनाली आंबेकर, सायली बेर्डे, प्राजक्ता रुमडे, सीमा सोलंकी, गीता चोहाण, वर्षा ढेकणे, सोनाली रसाळ, करुणा सागवेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.












