प्रहार डिजिटल, दै. प्रहार आणि मातृभूमी प्रतिष्ठान ऑनलाईन घरगुती गणपती आरास व सजावट स्पर्धा

प्रहार डिजिटल, दै. प्रहार आणि मातृभूमी प्रतिष्ठान ऑनलाईन घरगुती गणपती आरास व सजावट स्पर्धा

स्पर्धेचे नियम व अटी

प्रहार डिजिटल, दै. प्रहार आणि मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी Online गणेश आरास व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यातून गणेशोत्सवामध्ये तयार केलेल्या घरगुती देखाव्याला

प्रथम बक्षीस रु. 10,000 प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,
द्वितीय बक्षीस रु. 7,000 प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,
तृतीय बक्षीस रु. 5,000 प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तर
2 उत्तेजनार्थ बक्षीस रु. 3,000 प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मर्यादीत आहे.

▫️ देखावा सजावटीसाठी कोणतीही थीम राहणार नाही.

▫️ जेवढा जास्त युनिक विषय, तेवढी जिंकण्याची शक्यता जास्त.

▫️ सजावटी संदर्भातला व्हिडीओ स्वतः सजावटकाराने करावा अथवा ग्रुपने करावा.

▫️ कोणते साहित्य वापरले त्याची माहिती द्यावी आणि एकूणच त्यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे ते देखील सांगावे.

▫️ प्लास्टिक चा वापर करू नये.

▫️ व्हिडीओ जास्तीत जास्त 3 मिनिटांचा असावा.

▫️ व्हिडीओ हा ‘आडवाच’ असावा.

▫️ स्पर्धेसाठी येणारे सर्व व्हिडीओ प्रहार डिजिटल फेसबुक पेजवर आणि निवडक व्हिडीओ You Tube channel वर दाखवले जातील.

▫️ यातील निवडक व्हिडीओ हे इंस्टाग्राम किंवा फेसबूक पेज वर अपलोड केले जातील.

▫️ परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील.

▫️ प्रहार डिजिटल मध्ये आपला सहभाग असलेला ग्रुप क्रमांक कळवा.

▫️ ग्रुप मध्ये सहभाग नसल्यास खालील लिंक ला क्लिक करून सामील व्हा.

https://chat.whatsapp.com/HDtIPmJ47R6J4PjlhEWVfd

तर group मध्ये सहभागी होण्यासाठी QR कोड सुद्धा देण्यात येत आहे.

स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख व वेळ – २३ सप्टेंबर २०२३, रात्री ११.५९ पर्यंत

सदर स्पर्धेसाठी व्हिडिओ पुढील क्रमांकावर पाठवावेत. 9422371907 / 9970391707. निकाल तारीख लवकरच कळवण्यात येईल.