राजापूर (वार्ताहर): विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष व विश्व हिंदू परिषदेला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण योगाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल यांचे वतीने शिव शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.दि. ३० सप्टेंबर रोजी दोडामार्ग येथुन प्रस्थान करून हि यात्रा कोकण ठाणे नवी मुंबई पालघर असा असा प्रवास करत दि. १५ आॅक्टोबर रोजी मुंबईत हि यात्रा समाप्त होईल.
हि शिव शौर्य यात्रा रविवार दि ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता खारेपाटण, दुपारी ३:३० वाजता कोंड्ये थांबा, सायंकाळी ४:३० वाजता हि यात्रा राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकानजीक छत्रपती शिवाजी महाराज चौक राजापूर येथे दर्शन व मार्गदर्शनासाठी थांबेल तिथुन पुढे ती ५:३० वाजता लांजाला निघेल.राजापूर शहर व तालुक्यातील सर्व हिंदू बंधू भगिनी यांनी रविवारी दि. १ आॅक्टोबर सायंकाळी ठिक ४:०० वाजता शिव शौर्य यात्रेचे दर्शन व मार्गदर्शन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आपापल्या वाडीतील ढोल, झांज, लेझिम पथका सह राजापूर तालिमखाना नाका येथे उपस्थित रहावे. तिथुन हि यात्रा राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकानजीक छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात येईल त्यांनंतर ५ सुवासनींच्या हस्ते यात्रेतील छत्रपती शिवाजी महाराजांचे मुर्तीला औक्षण करण्यात येईल दर्शन व मार्गदर्शन झाल्यावर हि यात्रा लांजाच्या दिशेने मार्गक्रमण करेल.
या यात्रेला राजापूर शहरासह राजापूर तालुक्यातील हिंदू बंधू भगिनीं व शिवभक्त मावळे यांनी मोठ्या संख्येने या शिवशौर्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजापूर व सर्व हिंदुत्ववादी संघटना राजापूर यांचे वतीने करण्यात येत आहे.










