लांजा (प्रतिनिधी) लोकमान्य वाचनालय लांजाच्या वतीने नवरात्रोत्सव आणि वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी कर्तुत्ववान महिलांच्या आत्मचरित्रावर आधारित मला भावलेले आत्मचरित्र लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी आहे मनोहर तरी, मी वनवासी, समिधा, स्मृती चित्रे ,आयदान, हुमान, चाकाची खुर्ची, सांगते ऐका, जेव्हा माणूस जागा होतो, मास्तरांची सावली हे आत्मचरित्र असून वरीलपैकी एका आत्मचरित्राचे वाचन करून आपणास भावलेल्या आत्मचरित्राचा लेख ५०० ते १००० शब्दात स्वच्छ अक्षरात लिहून तो लोकमान्य वाचनालयाकडे पाठवायचा आहे.
सदर स्पर्धा ही लांजा तालुक्यातील महिलांसाठी असून महिलांनी आपला लेख १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लोकमान्य वाचनालय येथे पाठवायचा आहे. प्रथम तीन क्रमांकासह दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विजयालक्ष्मी देवगोजी-९९७०५६७६३२ आणि सौ.ललिता भिंगे-९४२३२९५३९८ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे .तरी जास्तीत जास्त महिला वर्गांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.अभिजीत जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे ,कार्यवाह उमेश केसरकर यांनी केले आहे










