पोईप केंद्र शाळा 1 येथे अखेर कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त

 

माजी खासदार निलेश राणे यांचा पाठपुरावा : सरपंच श्रीधर नाईक यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : माजी खासदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर पोईप केंद्र शाळा 1 येथे शिक्षण विभागाने कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त केला आहे.

पोईप केंद्र शाळा नं. 1 येथे कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या प्रश्ननी जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेंद्र पालव, उपासरपंच, सदस्य व पोईप ग्रामस्थ यांनी माजी खासदार निलेश राणे यांचे काही दिवसांपूर्वी लक्ष वेधले होते. निलेश राणे यांनी शिक्षण विभाग वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पोईप केंद्र शाळा 1 येथे कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त करावा याबाबत चर्चा केली होती. शिक्षण विभागानेही सकारात्मक प्रतिसाद देत शाळेत कामगिरी शिक्षक जागी कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त केला आहे. याबाबत सरपंच श्रीधर नाईक यांनी पालक व ग्रामस्थ यांच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले.