गोठणे सडेवाडी, बांदकीवाडी ग्रामस्थांचे खड्डेमय रस्ता ठिकाणी श्रमदान 

मालवण | प्रतिनिधी : रामगड, गोठणे, सडेवाडी मार्गे सांडवे या रस्त्याची खडी उखडून रस्ता पुर्णपणे नादुरुस्त झाला आहे. सदर भाग हा घाटीचा असल्याने तेथे अपघात होत आहेत. मालवण पं.स. माजी उपसभापती राजु परूळेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थानी याठिकाणी श्रमादान करत रस्त्यावर पसरलेली खडी बाजूला करून अपघात होणार नाही या दृष्टीने रस्ता साफसफाई केली.

यावेळी ग्रामस्थ संतोष धुरी, माजी सरपंच विजय घाडी, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र सांडव, दयाळ हाटले, सुरेश साटम, सुरेश घाडी, आबु साटम, सागर मुटल,अक्षय साटम, राजु जगताप, रोहन वरक, उपसरपंच बाळा परब व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

राजू परुळेकर यासाह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी रस्त्यासाठी मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे याबाबत अर्ज करण्यात आले आहे. रस्ता प्रश्न बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे ग्रामस्थ यांनी सांगितले.