राजापूर (प्रतिनिधी): मातोश्रीवरून लाथ मारून हाकलल्यानंतर रडारड करून मातोश्रीला लाखोली वाहणारे आ. भास्कर जाधव आता मातोश्रीची हुजरेगीरी करत आहेत. ज्यांना गुहागर, चिपळूणच्या पलिकडे कोण ओळखतही नाही त्या जाधवांनी निलेश राणे आपले प्रतीस्पर्धी नाहीत हे सांगणे हास्यास्पद असून जाधव यांनी राणेंवर बोलण्यापेक्षा त्यांना मातोश्रीने दिलेले नाच्याचे काम योग्य पध्दतीने पार पडावे तीच त्यांची पात्रता आहे अशी बोचरी टिका भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी केली आहे.
निलेश राणेंनी राजकारणातुन बाजुला होत असल्याबाबत केलेल्या पोष्टवर प्रतिक्रिया देताना जाधव यांनी निलेश राणे आपले प्रतिस्पर्धी नाहीत असे विधान केले होते. त्याचा खरपूर समाचार नागरेकर यांनी घेतला आहे. राणे कुठे आणि तुम्ही कुठे हे एकदा तुम्ही तपासा असा सल्ला जाधव यांना देताना, गुहागर आणि चिपळूणच्या पलिकडे कोण ओळखतो का ते पहा असा टोला नागरेकर यांनी लगावला आहे.निलेश राणेंनी खासदार म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गचे प्रतिनिधीत्व केले आहे. तुम्ही केवळ आमदार आहात, आणि आता तर उध्दव ठाकरेकडे कोणी नसल्याने तुम्हाला त्यांनी नाचाची भूमिका पार पाडण्याचे काम दिलेले आहे ते तुम्ही योग्य पध्दतीने करत आहात तेच करा कारण तुमची तीच पात्रता आहे अशी टीकाही नागरेकर यांनी केली आहे.
मातोश्रीवरून लाथ मारून हाकलल्यानंतर रडारड करून मातोश्रीला लाखोली वाहणारे तुंम्ही आज मातोश्रीची चाटुगिरी करत आहात, राणे हे स्वाभिमानी नेतृत्व आहे, ते स्वताहून पक्षातुन बाहेर पडले ते आजतागायत मातोश्रीवर कधी गेले नाहीत हे लक्षात ठेवा, त्यामुळे राणेंवर बोलण्याची तुमची लायकी नाही असा टोलाही नागरेकर यांनी लगावला आहे.
चिपळूणच्या ग्रामदेवतेच्या पवित्र मंदिरात गावकर व ग्रामस्थांना शिवीगाळ करणाऱ्या तुमच्यासारख्या नतदृष्टयाला या निवडणूकीत गाडण्याचा निर्धार आता चिपळूण गुहागर मतदार संघातील जनतेने केलेला आहे. त्यामुळे निवडणूकीनंतर तुंम्हाला फुल टाईम नाच्याची भूमिका बजवावी लागणार आहे, राणेंची चिंता करू नका असा टोलाही नागरेकर यांनी लगावला आहे.










