निवडणुक विषयक कामकाजात दुर्लक्ष; खेड मधील ग्रामसेवकावर गुन्हा

निवडणूक आयोगाकडून तक्रार, गुन्हा दाखल

खेड | प्रतिनिधी : जाणीवपूर्वक निवडणुक विषयक कामकाजात दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक आयोगाकडून ग्रामसेवका च्या कामावर आक्षेप घेत दिलेल्या तक्रारी नुसार येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार १७ जुलै २०२३ रोजी ते आता पर्यत मतदान केंद्र सुकीवली येथे घडला होता. ज्ञानेश्वर विठ्ठलराव डोणगावे असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे या प्रकरणी उमाकांत वसंतराव देशमुख यांनी तक्रार दाखल केली.

यातील डोणगावे यांनी मतदान केंद्रिस्तरिय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली असताना दरम्यानचे कालावधीत निवडणुनक आयोगाकडुन प्राप्त सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष निवडणुकी सारखा न महत्त्वाचा व अत्यंत तातडीचे कामकाजात जाणीव पूर्वक दिरंगाई ल कुचराई केली आहे व सध्याही जाणीवपूर्वक निवडणुक विषयक कामकाजात दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले असुन त्यांनावरिष्ठ कार्यालयातून वेळोवेळी नोटीस काढूनही त्याचा खुलासा सादर केलेला नाही. तसेच निवडणुकीचे कामात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत व मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे म्हणून.लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे