तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी जाहीर केली तालुका कार्यकारिणी
लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका भाजपाची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे. लांजा तालुका भाजपाची बैठक ही नुकतीच रेस्ट हाऊस येथे पार पडली होती. या बैठकीला भाजपाचे लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणूक प्रमुख प्रमोद जठार तसेच जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर, तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, निमंत्रित सदस्य विजय कुरूप ,नगरसेवक संजय यादव, महिला तालुकाध्यक्ष परिणीती सावंत हे मान्यावर उपस्थित होते .त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी लांजा तालुक्याची कार्यकारणी जाहीर केली.
भाजपाची नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, उपाध्यक्ष अनंत चौगुले, सचिन आठल्ये ,कमलाकर शिवगण, नरेंद्र राणे सरचिटणीस म्हणून विराज हरमले, शैलेश खामकर तर चिटणीस म्हणून सुनील गुरव ,सौ तनिषा कांबळे, शिवाजी पराडकर, शंकर गांधी, चंद्रकांत खामकर यांची , कोषाध्यक्ष म्हणून श्रेयश मुळे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्य म्हणून नारायण राघो राणे, अनंत बराम, रामदास नामे, सुरेंद्र खामकर, रुपेश तोसकर, पंकज शेलार, चंद्रकांत बंडबे, जयवंत दाभोळकर, संतोष सुर्वे, संदेश गुरव, राजेंद्र धनावडे, वैभव पाष्टे, विकास पांचाळ, मिलिंद आठल्ये ,तुकाराम प्रिंदावणकर , विकास आयरे, मंगेश कदम, बाळकृष्ण पाटील, महेश मेस्त्री ,सुशील पांचाळ, नचिकेत पेंढारी, सचिन रांबाडे, सौ. शारदा गुरव, सौ. अंजली पानगले ,सौ देवयानी पांचाळ, सौ मानसी संदीप डाफळे, सौ साक्षी पराडकर तसेच भरत कोळवणकर ,कृष्णा जाधव, अरुण यादव यांची निवड करण्यात आली आहे.
याच बैठकीदरम्यान माजी पदाधिकारी भरत कोळवणकर आणि वैभव पाष्टे यांनी पुन्हा भाजपमध्ये सक्रिय प्रवेश केला. त्यांचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी स्वागत केले. दरम्यान सर्व नूतन कार्यकारणी पदाधिकारी आणि सदस्य यांनी आगामी काळात तालुक्यात पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करून तालुक्यात पक्षाला एक नंबरचे स्थान मिळवून देण्याचे आवाहन यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी केले.











