खेड(प्रतिनिधी) खेड शहरासह आता चोरट्यानी आपला मोर्चा शहरा लगत असलेल्या गावां कडे वळवला असून चोरीचे सत्र आजच्या घडीला कायम आहे २८ रोजी रात्रीच्या सुमारास खेड ते अलसुरे जाणारे रोडवर भोस्ते जलालशहा मोहल्ला येथील क्वालिटी फॅक्टरी अज्ञात चोरटयांनी फोडून ३० हजार ६०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली
या प्रकरणी राहिल गोपीदास पिल्ले, वय ३० वर्षे व्यवसाय – बेकरी, रा. भोस्ते जलालशहा मोहल्ला ता.खेड, जि. रत्नागिरी,यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
यातील फिर्यादी यांचे मालकीचे क्वालिटी फॅक्टरीचा अज्ञात चोरट्याने समोरील दर्शनी दरवाजा उघडुन त्याद्वारे आत प्रवेश करुन ऑफिसचे दरवाजाचे लॉक हत्याराने तोडुन दरवाज्याचा कोयंडा कट करुन त्याद्वारे ऑफिसमध्ये प्रवेश केला ऑफिसचे काउन्टरचे डावेबाजुचे ड्रॉवरमध्ये ठेवलेली ३० हजार ६०० रुपयांची रोकड तसेच अँल्युमिनीयमचे पडदे लावण्याचे ०३ (तीन) रॉड, कागदपत्राची फाईल काउन्टरचे ड्रॉवरसह चोरुन नेली .या प्रकरणी अज्ञात चोरट्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे










