माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वैभववाडी तालुका प्रचार प्रमुख पदी कुणाल मोरे

स्वप्नील कदम | भुईबावडा
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या राज्यव्यापी संस्थेच्या वैभववाडी तालुका प्रचार प्रमुख म्हणून भुईबावडा येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल मोरे यांचीमाहिती अधिकार कार्यकरता महासंघचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते पदनीयुक्ती निवड झाली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र कुणाल मोरे यांना देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबाबत सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. कुणाल मोरे हे भुईबावडा येथे वास्तव्यास असून ते अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात पुढे असतात. अन्यायाविरुद्ध लढण्याची कार्यपद्धती कुणाल मोरे यांच्यामध्ये आहे. गांगेश्वर विद्यामंदिर प्रशालेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ते काम करत आहेत यांच्या निवडीबाबत अभिनंदन केले जात आहे.