श्री कुर्लादेवीचा मूर्तीप्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा 20 ते 22 नोव्हेंबर रोजी

वैभववाडी | प्रतिनिधी : कुर्ली गावची ग्रामदैवता श्री कुर्लादेवीचा मुर्तिप्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा दि. २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. या निमित्ताने श्री कुर्लादेवी देवस्थान उपसमिती व देवस्थान चे मानकरी, बारा पाच यांच्या  वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. श्री गणेश पूजन, मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण मुर्तिप्राणप्रतिष्ठापना सोहळा उद्योजक दीपक द.कदम यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे.

सकाळी १० वा. कलश दिंडी, सकाळी ११ वा. ग्रामदेवतांचे व परिवार देवता आमंत्रण, गणपती पुजन, पुण्याहवाचन, द्वादश कलश पुजन, जलानिवास, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, रात्रौ ७ वा. रामायणाचार्य प्रा. नाना महाराज कदम (बिड) यांचे सुश्राव्य किर्तन उद्योजक दीपक कदम यांच्या सौजन्याने होणार आहे. मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वा. मंडप देवतांचे आवाहन, पुजन व मुख्य देवतांचे जलाधिवास, पुष्पाधिवास, फलाधिवास, धान्याधिवास, शय्याधिवास, अग्नी स्थापना तत्वहोम हवन, दुपारी १.३० वा. अरुण शिवराम पाटील यांच्या सौजन्याने महाप्रसाद, नवतरुण मित्रमंडळ कुर्ली टेंबवाडी यांच्या सौजन्याने रात्रौ १० वा. बुवा संदिप पुजारे नाडन देवगड व बुवा व्यंकटेश नर उंडील देवगड यांचा डबलबारी भजनांचा जगीं सामना होणार आहे.

बुधवार २२ नोव्हेंबर रोजी  सकाळी ७ वा. स्थापित देवतांचे पुजन, सकाळी ९ वा. श्री. गगनगिरी महाराज यांचे शिष्य दिपक महाराज (झांजूचेपाणी, दाजीपुर) यांच्या शुभहस्ते श्री कुर्लादेवी मंदिर कलशारोहण सोहळा, सकाळी १० वा. मुर्तिप्राणप्रतिष्ठापना सोहळा, तत्वन्यास पूजा, बलीदान, पुर्णाहूती, दुपारी ११ वा. श्री कुर्लादेवी स्थापित देवीचे पुजन उदयोजक दीपक कदम यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ११.३० वा. आ. नितेश राणे यांच्या हस्ते देवीची पूजा, दुपारी १.३० वा. राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पीळणकर आणि परिवार यांच्या सौजन्याने महाप्रसाद, रात्रौ १० वा. नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार नाट्य मंडळ, माळगांव ता. सावंतवाडी यांचे “चित्रांग गंधर्व उद्धार” दशावतारी नाट्य प्रयोग जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले आहे. तरी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कुर्लादेवी देवस्थान उपसमिती व देवस्थान चे मानकरी, बारा पाच व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो: श्री.कुर्लादेवी