कोकण प्रवासी महासंघाने केला संताप व्यक्त
चिपळूण (वार्ताहर) :कोकण प्रवासी महासंघ यांनी चिपळूण आगार व्यवस्थापक रंजीत राजेशिर्के यांना चिपळूण ते गुहागर व्हाया गिमवी-मुंढर ही बस फेरी बायपास मार्गे न जाता चिंचनाका ते गुहागरनाका अशा मार्गे जावी यासाठी 15 दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले.महामंडळ यांनी याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात तसे होत नसल्यामुळे कोकण प्रवासी महासंघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
कोरोना नंतर महामंडळाने चिपळूणसह परिसरात जाणाऱ्या सर्वच बस सेवा नियमितपणे सुरू केल्या त्याच पद्धतीने चिपळूण ते गुहागर व्हाया गिमवी-मुंडर हि बस देखील सुरू करण्यात आली.मात्र अनेक दिवसापासून चिपळूण आगारातून सकाळी 9:45 वाजता गिमवी- मुंढर व्हाया ही बस सेवा चिपळूण पावर हाऊस बायपास या मार्गाने जाते. त्यामुळे बाजारात असलेल्या प्रवाशांना या गाडीचा उपयोग होत नाही. ग्रामीण भागातील आणि गिमवी-मुंढर येथील प्रवाशांना बाजारातून पुन्हा बस डेपो मध्ये रिक्षा करून जावे लागते.
त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे.याबाबत सातत्याने चिपळूण आणि गुहागर बस प्रशासन यांना माहिती दिली आहे.त्याचबरोबर चिपळूण व गुहागर वाहतूक नियंत्रकांना व विभागीय कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघू शकला नसल्याचे कोकण प्रवासी महासंघाने सांगितले.चिपळूण आणि गुहागर आगार प्रमुख यांना अनेकदा सांगूनही अधिकारी उद्यापासून होईल लवकरच सुरू होईल अशी आश्वासन दिले जातात मात्र होत काही नाही तातडीने चिपळूण ते गुहागर व्हाया गिमवी-मुंढर बायपास मार्गे न जाता चिंचा नाका जुना स्टॅन्ड व गुहागर नाका मार्गे कायमस्वरूपी सोडण्यात यावी असे निवेदन कोकण प्रवासी महासंघाचे अध्यक्ष गणेश चव्हाण, उपाध्यक्ष दीपक शिरकर, महासचिव संपादक वसंत भोसले, कार्याध्यक्ष अनिल कुमार जोशी, खजिनदार अविनाश चव्हाण, चिपळूण संपर्क दिलीप चव्हाण, गुहागर संपर्क दत्ताराम जाधव, सल्लागार मनोहर साळवी, सत्यवान महापुस्कर यांनी दिले आहे.











