भाजलेल्या महिलेचे उपचारा दरम्यान निधन

खेड | प्रतिनिधी : आपल्या राहात्या घराच्या परड्यामध्ये चुलीवर पाणी गरम करीत असताना अचानक आगीचा भडका होऊन गंभीररित्या भाजलेल्या तालुक्यातील फळसोंडा येथील मुनिरा दिलेर प्रकार या ५६ वर्षाच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १७ जुलै २०२३ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता घडली होती.
त्यानंतर त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालय कळंबनी या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यानंतर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटल व तेथून १८ ऑगस्ट रोजी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र २६ ऑगस्ट रोजीच दुपारी एक वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत २१ नोव्हेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे