Terrible accident on Mumbai Goa highway, car breaks passenger shed and ram
दोन तरुणी गंभीर जखमी
उत्तम सावंत नांदगाव
मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव दत्तमंदिर येथे चारचाकी मारुती स्विफ्ट कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने येथील प्रवासी निवारा शेड, रॅम्प जमिनदोस्त करून टाकली.यामध्ये शेडमधील दोन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या.एका युवतीचे दोन्ही पाय जायबंदी होऊन गंभीर दुखापत झाली.हि घटना सकाळी ८:३० च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरीहून गोव्याकडे जाणारा चारचाकी चालक निनाद सुभाष शिरदनकर (रत्नागिरी) नांदगाव दत्तमंदिर पाटील वाडी जवळ आला असता वाहनावरील ताबा सुटला आणि भयंकर वेगाने लगतची निवारा शेड धडक देऊन त्यापुढील लोखंडी रॅम्प तोडून रस्त्यावर पलटी झाला.
यावेळी शेडमध्ये दोन महाविद्यालयीन युवती कणकवली येथे महाविद्यालयात जाण्यासाठी थांबल्या होत्या.या अपघातात प्रेरणा राजेंद्र तांबे (१८) गंभीर जखमी असून तिचे दोन्ही पाय जायबंदी असल्याचे सांगितले गेले.तिला उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर दुसरी युवती व चालक किरकोळ जखमी झाले.
अधिक तपास कणकवली पोलीस करत असून पोलिस चंद्रकांत माने घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते.












