भारतीय संविधान सभेने दिलेला संकल्प भारतीय नागरिकांचे ध्येय बनलं – निलेश पवार

कणकवली : येथील सिध्दार्थनगर येथील संविधान स्तूप व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या संविधानाचे वाचन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी कलमठ सरपंच संदिप मेस्त्री, चेअरमन सूर्यकांत कदम यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

यावेळी नीलेश पवार, चेअरमन सूर्यकांत कदम, महादेव कदम, श्रद्धा कदम, बंडू कांबळे, सचिन खोचरे, धीरज मेस्त्री, रोहन कदम, तय्यब शिरगावकर, निर्मला पवार, माधवी कदम, संदिप पवार, अंकुश पवार, गणपत पवार, चिन्मयी जाधव, विशाखा कदम, महेंद्र कदम, खुशाल कोरगावकर, गणेश सावंत उपस्थित होते.

 

यावेळी निलेश पवार म्हणाले की, संपूर्ण देशात २६ नोव्हेंबर हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर भारताच्या संविधानाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि माणसाच्या मनामध्ये दैदीप्यमान बदल घडवून आणण्याचे हे सामर्थ्य आहे. प्रत्येक घरा – घरामध्ये जास्तीत – जास्त संविधान पोहोचणे गरजेचे आहे. याची जागरूकता भारतीय नागरिकांमध्ये व्हावी, यासाठी ठिक – ठिकाणी २६ नोव्हेंबरला कार्यक्रम आयोजित केले जातात. तसाच एक कार्यक्रम दरवर्षी कलमठ या गावी सिद्धार्थ गृहनिर्माण संस्थेच्या वतीने संविधान स्तूप या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत असतो. याबाबत त्यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे, असे कौतुकोद्गार श्री. पवार यांनी काढले.

 

पुढे ते म्हणाले, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून संविधान सभेत संविधान जेव्हा स्वीकारल गेले तेव्हा संविधान सभेने या देशातील प्रत्येक भारतीय नागरिकांना जो एक संकल्प दिला होता, ते प्रत्येक नागरिकाचे ध्येय बनलं. त्यामुळे अया ध्येयाची आठवण आपल्याला फक्त एक दिवस न होता प्रत्येक दिवशी व्हावी म्हणून या ध्येयाचा विसर न व्हावा यासाठी संविधान सतत आपल्या मनपटलावर राहणं गरजेचं आहे, असेही श्री. पवार म्हणाले.