रत्नागिरी :अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर नाटकाच्या प्रयोगा निमित्ताने पहिल्यांदाच रत्नागिरी मध्ये येत आहेत. त्यांचा अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने नागरी सत्कार रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम राधाबाई शेटे सभागृह,गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे 3 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. या सत्कार समारंभासाठी उपस्थित रहावे ही विनंती अ. भा. म. ना. परिषद रत्नागिरी शाखा कार्याध्यक्ष आणि सह कार्यवाह अ. भा.म.ना.प. मध्यवर्ती मुंबई समीर इंदुलकर यांनी केले आहे.











