सामाजिक सर्वेक्षणातून ग्रामीण समस्यांचे निराकरण शक्य : प्रा. सचिन सनगरे

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय निवासी शिबीर चांदेराई येथे होते. या शिबिरात विद्यार्थांना सामाजिक सर्वेक्षण या विषयावर प्रा. सचिन सनगरे यांनी मार्गदर्शन केले. स्थानिक सामाजिक सर्वेक्षणातून ग्रामीण समस्यांचे निराकरण करता येणे शक्य आहे. असे मत त्यांनी मांडले.

 

विद्यार्थाना समाजातील परिस्थितीचे भ्हन असावे, आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनाची माहिती असावी. स्वतामधील तसेच आजूबाजूच्या माणसांमधील कौशल्ये व वैशिष्ट्ये माहिती असावीत. यामुळे आपल्याला संधी आणि समस्या यांचा शोध घेता येतो. आपल्या कृतिशील मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थांकडून प्रतिसाद घेतला. सोबतच स्थानिक उत्पादन, विक्री, ग्राहक यांच्या समस्यांचा सर्वे त्यांनी केला. स्वयंसेवक विद्यार्थी या कृतीशिल व्याख्यानात सहभागी झाले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. दानिश गनी, प्रा. हर्षदा पटवर्धन , प्रा. उमा जोशी , ग्रामस्थ व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.