विधवा प्रथा बंद माझे मत लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा केला गौरव
खेरशेत मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृति मंचतर्फे आयोजन
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील खेरशेत येथाल मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृति मंच या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्यावतीने ज्या ग्रामपंचायतीमार्फत अनिष्ट विधवा प्रथा बंदच्या आदेशाची अंमलबजावणी करून विधवा महिलांच्या सन्मानाकरिता सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक उपक्रम राबविले आहेत अशा ग्रामपंचायतीसह विधवा महिला बचत गट, महिला मंडळे, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांना स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ पुरस्कार संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय कदम यांनी मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा गौरव केला आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चिपळूण येथे रविवार १० डिसेंबर रोजी पार पडला. अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
आधुनिक क्रांतीपर्वातील स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान-२०२३ सन्मानार्थ पुरस्कार प्राप्त झालेल्यात रत्नागिरी- नाणीजचे सरपंच गौरव संसारे, पानवल सरपंच तनिष्का होरंबे, भडकंबा सरपंच बापू शिंदे, संगमेश्वर-मुरादपूरचे सरपंच मंगेश बांडागळे, गुहागर-उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, गुहागर- आबलोली सरपंच वैष्णवी नेटके, वरोली सरंपच नारायण चिपळूण-भिले सरपंच अदिती गुडेकर, पाचाड सरपंच नरेश घोले, दापोली- तेरेवायंगणी सरपंच मनोहर करबेले, नारडुवे सरपंच कृष्णा के जोगले यांचा समावेश आहे. सन्मानित सामाजिक संस्था नाचणे (रत्नागिरी) , पन्हळे (राजापूर) पल्लवी प्रतिष्ठान संस्थापक उमेश शिगवण,
जुवाठी (राजापूर), अक्षरमित्र संस्थापक बी. के. गोंडाळ, सन्मानित महिला बचत गट-पाचाड (चिपळूण) आनंदी महिला बचत गट अध्यक्षा गायत्री सुर्वे व सन्मानित ज्येष्ठ समाजसेवक कोकणचे गाडगेबाबा साखरपा (संगमेश्वर) येथील प्रबोधनकार मारुती काका जोयशी यांना शाल, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय विधवा प्रथा बंद माझे मत लेखन स्पर्धा सुद्धा या सस्थेने घेतली होती. राज्यातील दहा विजेत्यांना युग नायिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले लेखणी पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यामधे दै. प्रहार चे पत्रकार संतोष कुळे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकि्सक डॉ संघमित्रा फुले, डॉ.गावडे, दै. रत्नभूमीच्या संपादिका धनश्री पालांडे, चंद्रकांत सावंत, दत्ताराम मोहिते, संस्था अध्यक्ष संजय कदम, संघराज कदम, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.












