चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडलतर्फे चिपळूण शहरातील नऊ प्रभागात महिलांसाठी व युवती यांच्यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी २७७ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर भाजप सेवा पंधरवडा व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
चिपळूण शहरातील युवती व महिला यांना घरबसल्या मोकळ्या वेळेत स्वयंरोजगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा. तसेच घरातील तिचा सन्मान वाढवा यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मोत्याचे दागिने, आकाश कंदील, विविध प्रकारच्या हस्त कला दाखविण्यात आल्या. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून कसा जास्त नफा मिळतो हेही दाखविण्यात आले. नामवंत प्रशिक्षक सौ. उमा म्हडदळकर यांनी त्याच्या टीमच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणासाठी जिल्हा सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, शहराध्यक्ष महिला मोर्चा रसिका देवळेकर, सरचिटणीस सारिका भावे, जिल्हा ओबीसी महिला अध्यक्ष वैशाली निमकर, कोषाध्यक्ष अश्विनी वरवडेकर, शीतल रानडे, पूनम काजरी, सोनल कारेकर, निकिता रतवा, रूही खेडेकर, अंजली कदम, पूनम मालशे, सौ. शीतप, स्वाती पटवर्धन, पूजा कदम, सौ.शिंदे, विमल लढ्ढा, स्नेहल पालकर, नूपुर बचिम, उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, उल्हास भोसले, शक्ती चव्हाण, विलास चव्हाण, कुणाल आंबेकर यांनी विशेष मेहनत घेतली.











