मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे येथे आर. पी. बागवे हायस्कुल आणि एम. जी. बागवे (भरतगड) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
सकाळी ८:३० वाजता उदघाटन, त्यानंतर सत्यनारायण महापूजा, रांगोळी स्पर्धा, भजन व आरती, फनी गेम्स, दुपारी स्नेह भोजन, माजी विद्यार्थी व्याख्याने व चर्चा सत्रे, सायंकाळी विद्यार्थ्यांचे गुण दर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटक मसुरे एज्युकेशन सोसायटी स्थानिक समिती अध्यक्ष महेश बागवे, शाळा समिती अध्यक्षा सरोज परब तर प्रमुख उपस्थिती म्हणून मसुरा एज्युकेशन
सोसायटी मुंबई कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दिपक परब, उपाध्यक्ष उत्तम राणे, सचिव नारायण सावंत, मर्डे सरपंच संदिप हडकर, देऊळवाडा सरपंच सुरेखा वायंगणकर, बांदिवडे सरपंच आशुतोष मयेकर, कोईल सरपंच अरविंद साटम, बिळवस सरपंच मानसी पालव, वेरली सरपंच धनंजय परब,पंचायत समिती माजी सदस्या गायत्री ठाकूर,माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.











