सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्या दिनदर्शिकेचे अनावरण

दूरदर्शनचे माजी कार्यकारी संचालक जयू भाटकर यांची उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : दूरदर्शनचे माजी कार्यकारी संचालक जयू भाटकर यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका भंडारी समाज दिनदर्शिका २०२४ चे अनावरण करण्यात आले. सावंतवाडी भंडारी भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सावंतवाडी भंडारी समाज मंडळाचे प्र. अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या हस्ते जयू भाटकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी दिलीप पेडणेकर, मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, सिद्धार्थ पराडकर राजेंद्र बिर्जे, देविदास आडारकर, संतोष वैज, नामदेव साटेलकर, जेष्ठ पत्रकार प्रविण मांजरेकर, चंद्रकांत वाडकर, गुरुदास पेडणेकर, गुंडू साटेलकर, समता सूर्याजी, वैशाली पटेकर, शीतल नाईक, देवता पेडणेकर, संगीता हडकर आदी उपस्थित होते.