जगबुडी, शास्त्री, कोदवली इशारा पातळीच्या वर

रत्नागिरी जिल्ह्यातील सकाळी 10 वा. चे नदी पातळीचे updates

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील नदी पातळीमध्ये वाढ झाली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने आता इशारा पातळीच्या वर वाहण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्षा कडून सकाळी दहा वाजता अपडेट करण्यात आली आहे.

 

खेड तालुक्यातील जगबुडी नदी ही सध्या इशारा पातळीच्या वर सहा. वीस मीटर पातळीवर वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी इशारा पातळीच्या वर 6.80 मीटरला वाहत आहे तर राजापूर तालुक्यातील कोदवली नदी पातळी ही इशारा पातळीच्या वर असून पाणी पातळी 6.10 मीटर इतकी आहे.

 

याशिवाय संगमेश्वर तालुक्यातील सोनवी, लांजा तालुक्यातील काजळी या नद्यांच्याही पाणी पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.