सुधीर प्रभूआजगांवकर यांची आजगाव ग्रंथालयास मदत

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील मूळ आजगाव गांवचे सुपुत्र व मुंबईस्थित सुधीर रघुनाथ प्रभूआजगांवकर यांनी मोठं दातृत्व दाखवत समाजात सामाजिक बांधिलकीने एक नवा आदर्श उभा केला आहे. श्री. प्रभूआजगावकर यांनी मराठी ग्रंथालय , आजगांवला संगणक संच व फर्निचरसाठी रोख ४० हजार रुपयांची आर्थिक मदत केली असून त्यांच्या या दानशूरपणाचे आजगाव ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. आजगांवचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये यांनी सुधीर प्रभूआजगावकर यांचे विशेष आभार मानून समाजातील इतरांनीही त्यांचा आदर्श जपावा, असे आवाहन केले आहे.