गोविंदगड चढण्याची स्पर्धा व आम्ही ऐकलेले बाळासाहेब निबंध स्पर्धेचे आयोजन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चिपळुणात विविध कार्यक्रम

चिपळूण (वार्ताहर) : शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चिपळूण शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. आम्ही ऐकलेले बाळासाहेब ही ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली असून ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील गोवळकोट भागातील गोविंद गड चढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी केले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २३ जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २१ जानेवारी २०२४ रविवार रोजी सकाळी ७:१५ वाजता गोवळकोट येथे गोविंदगड चढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा २ गटात होणार असून ८ वी ते १२ वी मुले आणि मुली अश्या गटात स्पर्धा पार पडणार असून पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व २ उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत. याची नाव नोंदणी २० जानेवारी २०२४ पर्यंत खालील नंबरवर करावी. स्पर्धेला येतेना आधारकार्ड व शाळेचे ओळखपत्र आणणे गरजेचे आहे.

याबाबत अधिक संपर्कासाठी राजू विखारे ७६२०९३०७५९, सुषमा कासेकर ८६६९०१०६६३, उदय जुवळे ९७६६०४८८७७, संकेत शिंदे ९७६६८३३२५०, विशाल बेचावडे ९७६३०५४०४७ यानंबरवर संपर्क करावा असे आवाहन महिला शहर संघटक वैशाली शिंदे यांनी केले आहे. तसेच ८ वी ते १० वी विद्यार्थांसाठी आम्ही ऐकलेले बाळासाहेब ही निबंध स्पर्धा आयोजित केली असून विद्यार्थ्यांनी २० जानेवारी २०२४ पर्यंत आपले निबंध शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे द्यावेत. याबाबत अधिक माहितीसाठी युवा शहर अधिकारी पार्थ जागुष्टे ७४४७७७४४४२ तसेच आकाश कदम ७२७७५८४९९९, राहुल गुरव ७७५६८१२७२९, ओंकार गायकवाड ८५५१०६८८७६ यांच्याकडे संपर्क साधावा, या स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व २ उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत, अशी माहिती शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी दिली. तरी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.