मोकाट जनावरे रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसत असल्याने अपघात!!

गुरांच्या गळयात रेडियम पट्टा

विवेकानंद नाईक यांच्या पुढाकाराने युवकांचां उपक्रम स्तुत्य

दोडामार्ग | सुहास देसाई : दोडामार्ग तालुक्यातील बाजारपेठ सह मुख्य रस्त्यावर मोकाट गुरे रात्र दिवस बसलेली असतात या गुरांचा कायम बंदोबस्त करावा अशी मागणी होत होती पण नगरपालिका प्रशासनाने कोनवाड्यात रवानगी केली पण मालक सहकार्य करत नसल्याने काही वेळा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी गोवा येथे जखमींनागो शाळेत उपचारासाठी दाखल केले होते असे असतानाही रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोकाट गुरे अपघातात जखमी केले जाते तसेच अनेक दुचाकी अपघातात जखमीना कायम अपंगत्व आल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यावर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांच्या पुढाकाराने गुराचे गळयात रेडियम पट्टा बाधून दोडामार्ग शहरातील युवकांनी प्राणीमित्र म्हणून आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे त्याचे सर्वच स्थरातून कौतुक केलं जातं आहे

दोडामार्ग शहरातील मोकाट जनावरे रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसत असल्याने अनेक मोठ्यप्रमाणावर गाड्या येजा करत असल्याने अंधारात जनावरांच्या पायावरून गाड्या घालतात त्यामूळे अनेक जनावरे दगावली आहे तर काही त्या अवस्थेत रस्त्यावर तळमळत असतात त्यामुळे मुक्या जनावरांचे बाजारात दुकानासमोर होणारी गर्दी व प्रवासी वाहतूक यामुळें कोंडी होतें या रस्त्यावर वासरू व गाय अनेक जखमी झाले असल्यानं तळमळत असतात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभुत आहे त्याचं बरोबर युवकांनी व प्राणीमित्र यांनी मोकाट जनावरे रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसत असल्याने त्यांना गळयात बेल्ट घालून रेडियम मुळे वाहनचालकांना गुरे दिसतील व अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करता येईल हा स्तुत उपक्रम राबविलां आहे यामध्ये भाजपचे पदाधिकारी समीर रेडकर, सुमित म्हाडगुत, महेश मयेकर, स्वप्निल गवस,साजन गवस,विराज सावंत,सागर नाईक, रोहन खडपकर, विनायक खडपकर,शुभम मुळगावकर, निलेश पटकारे, लक्ष्मण खडपकर, आदींनी परिश्रम घेतले मोकाट गुरे पकडतानाही त्याच्या मालकांनी सहकार्य केल्यास सर्वच गुरांना बेल्ट किंवा पट्टा बाधून होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केले आहे