सुगम संगीत गायन स्पर्धेत गोव्याचा शुभम नाईक प्रथम

वैयक्तिक नृत्य स्पर्धेत नंदिनी हेमंत बिले प्रथम

सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्गचे आयोजन

दोडामार्ग : प्रतिनिधी

सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्गच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित आयोजित करण्यात आलेल्या खुली सुगम संगीत गायन स्पर्धेत काणकोण (गोवा) येथील शुभम नाईक याने प्रथम क्रमांक मिळविला. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत कारिवडे (सावंतवाडी) येथील नंदिनी हेमंत बिले हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धाकाना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्गच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित उद्योन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खुली ‘सुगम संगीत गायन’ स्पर्धा व ‘वैयक्तिक नृत्य’ स्पर्धा आशीर्वाद मंगल कार्यालय झरेबांबर याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सिने अभिनेते तथा युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन निवड समितीचे सदस्य विष्णू सुतार यांच्या हस्ते श्रीगणरायच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

यावेळी व्यासपीठावर सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, भाजप उपाध्यक्ष सुनील गवस, यशवंत कुबडे, प्रवीण देसाई, संदेश देसाई, दोडामार्ग पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नदीप गवस, संदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते ईद्रीस सय्यद, रमाकांत तळकटकर, ज्ञानेश्वर सुतार, उद्योजक गंगाराम कोळेकर, नाट्यकर्मी सदाशिव पाडगावकर, आरपीआय जिल्हा सरचितणीस प्रकाश कांबळे, सह मंचाचे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव सागर नाईक, सहसचिव विलास आईर, खजिनदार महेश पारधी, सल्लागार संजय सुतार आदी उपस्थित होते.

 

यावेळी बाबा टोपले म्हणाले,

सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्गच्या माध्यमातून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ही गौरवास्पद बाब आहे. भविष्यात एक मोठा कार्यक्रम मी पुरस्कृत करणार आहे. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्याचा नियोजन मागचा हेतू आहे, असे सांगितले. यावेळी रत्नदीप गवस, प्रवीण गवस, सदाशिव पाडगावकर, सुनील गवस यांनी मार्गदर्शन केले.

 

स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे : (खुली सुगम संगीत गायन स्पर्धा) प्रथम शुभम नाईक काणकोण गोवा, द्वितीय तेजस्वी महेंद्र हळीत केरी सत्तरी गोवा, तृतीय पारस विश्वनाथ गवस डोंगरपाल सावंतवाडी, उत्तेजनार्थ सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर बांदा. (वैयक्तिक नृत्य स्पर्धा) प्रथम नंदिनी हेमंत बिले कारिवडे, द्वितीय वैष्णवी देऊआप्पा बोडके चराठा, तृतीय शंकर रमाकांत गवस तळकट, उत्तेजनार्थ आराध्या अभय कोठावळे इन्सुली.

 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, कळणे सरपंच अजित देसाई, संजय देसाई, सुनील मांजरेकर, विशांत तळवडेकर, भिकाजी कोकरे, प्रेमानंद कुबल, शिवराम सावंत, सखाराम जंगले, ज्ञानेश्वर सावंत, संदीप लोंढे, रॉनी फर्नांडिस, जयवंत तूळसकर, बाळा धाऊसकर, महेश नाईक, अभिजित देसाई, अनंत आरोलकर, बाबी हळदणकर, राजन केसरकर, उदय सावंत, विलास सावंत यांचे सहकार्य लाभले.

 

गायन व नृत्य स्पर्धेचे अर्जुन (बबन) आरोंदेकर, मालिनी परब, डॉ. सौ. केतकी समीर गवस व दिव्या शिरोडकर यांनी परीक्षण केले. संगीत साथसंगत हार्मोनियम गणू कांबळे, तबला अजित दळवी यांनी केली.

 

यावेळी सिने अभिनेता दत्ताराम टोपले, रंगकर्मी नित्यानंद पेडणेकर, विष्णू सुतार यांचा मंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार महेश पारधी यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष शंकर जाधव यांनी तर आभार उपाध्यक्ष गंगाराम कोळेकर यांनी मानले.