कम्प्युटरच्या जून्या पार्टांतून साकारली श्री रामांची मूर्ती

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील युवकाची कलाकृती

सावंतवाडी । प्रतिनिधी : अयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील बांदेकर फाईन आर्ट महाविद्यालयाच्या विष्णूप्रसाद सावंत या विद्यार्थ्याने कम्प्युटरचे जूने पार्ट जोडून त प्रभू श्री रामांची कलाकृती साकारली आहे. विष्णूप्रसाद हा सावंतवडीतील शांताई कम्प्युटरचे प्रोपायटर संतोष सावंत यांचा सुपुत्र आहे. ही प्रतिकृती साकारताना त्याने मदरबोर्ड, कॅपेसिटर, प्रोसेसर, टोनर रॅम, कीबोर्ड आदी साहित्य वापरले आहेत. त्याच्या या कलाकृतीचे कौतुक होत आहे.