लांजा (प्रतिनिधी) माणुसकीची भिंत प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने तालुक्यातील उपळे वीर शाळेला शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.माणुसकीची भिंत या प्रतिष्ठानच्या वतीने उपळे वीर शाळेतील ५८ मुलांना ७०० रुपये किमतीची स्कूल बॅग, वह्कंया ,कंपास, बॉटल, डबा असे किट मुलांना देण्यात आले. दिव्यांग संघटना सचिव गणपत कुर्तडकर यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडला.
यावेळी माणुसकीची भिंतचे संस्थापक दीपक कांबळे यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुली ,मुलगा उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आयपीएस अधिकारी रमेश बी कदम, मुंबई महानगरपालिका वरिष्ठ अधिकारी श्री गार्डी, पुनस गावचे माजी सरपंच ईलियाज बंदरी, गावकर शांताराम वीर ,सौ. वेदीका वीर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक बळीराम सोळंकी यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षक दिनेश झोरे यांनी केले.












