
लांजा( प्रतिनिधी) संगमेश्वर निवे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात लांजा येथील डी.जे.सामंत इंग्लिश मीडियम स्कूलने भरघोस यश संपादन केले .
सदर जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा हा नुकताच संगमेश्वर निवे येथे पार पडला. यामध्ये डी.जे. सामान इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास सर्वच तालुक्यातील शाळांनी यामध्ये आपला सहभाग दर्शवला होता. यामध्ये डी.जे.सामंत इंग्लिश मीडियम स्कूलने लोकनृत्य स्पर्धेत गाईड विभागात द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे शोभायात्रा या स्पर्धेत स्काऊट आणि गाईड पथकाला द्वितीय क्रमांक मिळाला.
या संबंधित विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे पालक, शिक्षक, व्यवस्थापन समितीकडून अभिनंदन होत आहे.











