मालवण | प्रतिनिधी :छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे जलदुर्ग किल्ले सिंधुदुर्ग स्वच्छता मोहीम रविवार 28 जानेवारी रोजी राबविण्यात आली. शुर पराक्रमी मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवर स्वच्छता मोहीम राबवून शिवकार्याचा वारसा चालवण्याचा एक छोटासा प्रयत्न केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास इंदलकर म्हणाले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास इंदलकर, सदस्य – अविनाश इंदलकर, संकेत इंदलकर, संतोष इंदलकर, विजय इंदलकर, विकास इंदलकर, संतोष इंदलकर, निलेश इंदलकर, तसेच प्रमोद सुतार, अनिल परामाने आदी उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठान मार्फत गडावरील दुधाची विहीर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा, महाराज यांची सदर स्वच्छ करण्यात आली. गडावरील बुरूजाची स्वच्छता आणि वाढलेली झाडे काढण्यात आली. गडावरील प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बॉटल वगैरे साफ करण्यात आले तसेच त्याचे संकलन करून 20 गोण कचरा प्रतिष्ठान मार्फत मालवण नगरपालिका यांच्या कडे सुपूर्त केला.












