दुर्गवीर प्रतिष्ठानकडून किल्ले महिपतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील महिपतगडावर दुर्गवीर प्रतिष्ठान च्या सात दुर्गवीरांनी नव्याने उजेडात आलेल्या खेड दरवाजाच्या बाहेरील भाग मातीच्या ढिगाऱ्याखालून मोकळा केला.
या मोहिमेमध्ये दुर्गवीरचे स्थानिक सभासद श्री रोहित बालडे, स्वप्निल पाडावे,जय पाटील आणि रायगड विभागातून प्रमोद डोंगरे, विशाल बामणे, सूरज गोरीवले, प्रज्ञेश कानडे यांनी सहभाग घेतला होता. हळूहळू खेड दरवाजाचा एक एक भाग मोकळा होतोय. श्रमदान करणारे हात खूपच कमी प्रमाणात आहेत.आमच्या हातांना बळ द्या.आपणही या पुढील मोहिमांमध्ये सहभागी व्हा आणि आपला ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढे या.असे आवाहन करण्यात आले आहे