संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे 10 फेब्रुवारी माघी गणेशोत्सव

रत्नागिरी l प्रतिनिधी :प्रतिवर्षाप्रमाणे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे माघ शु.1 ते माघ शु.7 शके 1945 शनिवार दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी श्रींचे मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे.यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरात श्रींच्या उत्सवाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

यामध्ये 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते 11.30 श्रींची महापूजा व प्रसाद,सायंकाळी 4 ते 7 गणेशयाग देवता स्थापना त्यानंतर सायंकाळी 7 ते 7.30 सामुदायिक आरती व मंत्रपुष्प होणार आहे.रविवार 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 12 कलशारोहण वर्धापनदिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहूती करण्यात येणार आहे.सोमवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 सहस्त्र मोदक समर्पण होणार आहे.मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 माघी यात्रा होणार आहे.बुधवार 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 7.30 वा.सामुदायिक आरती व मंत्रपुष्प तसेच शुक्रवार 16 फेब्रुवारी रथसप्तमीला दुपारी 11.30 ते 2 वा.कालावधीत मंदिरात महाप्रसाद ठेवण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे शनिवार 10 ते बुधवार 14 फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी 7.30 ते 9.30 किर्तनमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.यात किर्तनकार ह.भ.प.श्री संदीपबुवा मांडके,पुणे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वा.“गाणी मनातील” ही प्रचलित भक्तिगिते,नाट्यगिते,भावगिते व देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफिल होणार आहे.त्याचप्रमाणे शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा.विनोदी नाटक भुलभुलैयाचेही आयोजन करण्यात आले आहे.