कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजाला

 

सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांकाच्या राज्यस्तरीय बँको ब्ल्यू रिबन २०२३ पुरस्काराने सन्मानित

लांजा( प्रतिनिधी) शहरातील कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या पतसंस्थेचा सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांकाच्या राज्यस्तरीय ” बँको ब्ल्यू रिबन २०२३ ” पुरस्काराने गौरविण्यात आले. दमण येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

 

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात ज्या सहकारी पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे. अशा सहकारी पतसंस्थाना अविज पब्लिकेशन , कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा , पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराचे आयोजन केले जाते.

सन २०२३ या वर्षासाठी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी संस्थेची आर्थिक स्थिती , व्यवस्थापन , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , व्यवसाय वाढीसाठी केलेल्या नविन योजना इ. बाबत संपूर्ण माहितीच्या आधारे , तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार नागरी पतसंस्था ठेवी रु. ४० ते ४५ कोटीपर्यंत या विभागामध्ये सलग सहाव्या वर्षी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा ” बँको ब्ल्यु रिबन – २०२३ ” या पुरस्कारासाठी कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या लांजा या पतसंस्थेची निवड करणेत आली होती.

दमण येथे ॲडव्हान्टेज २०२४ या राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा ” बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार मधुकरराव चौधरी (माजी सहकार आयुक्त पुणे )यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, संचालक नंदकुमार आंबेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे यांनी तो स्विकारला. यावेळी संस्थेच्या सभासद सौ. निलांबरी परवडी व सौ. स्नेहल आंबेकर या उपस्थित होत्या.