सेवादल काँग्रेस अध्यक्ष अशोक राणे यांची प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तक्रार
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष दादामिया पाटणकर हे उद्धटपणे वागत पदाधिकाऱ्यांना वारंवार अपमानित करत आहेत. तालुक्यात पक्ष संघटना कमकुवत करण्याचे काम पाटणकर यांनी केले आहे. १५ फेब्रुवारी रोजी वैभववाडी येथे पार पडलेल्या बैठकीत मला त्यांनी अपमानित करून बैठकितून बाहेर काढले. पक्ष संघटना वाचवण्यासाठी दादामिया पाटणकर यांना तात्काळ बाजूला करण्यात यावे अशी तक्रार वैभववाडी तालुका सेवादल अध्यक्ष अशोक राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
पाटणकर यांची सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन काम करण्याची मुळीच इच्छा नाही. पार पडलेल्या बैठकीत जिल्हा काँग्रेस सेवादल कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. असे उद्गार त्यांनी काढले.
याविषयावर आम्ही आक्षेप घेतला. यावरती पाटणकर यांनी मला कार्यालयातून जा. असे सांगितले. घडलेला प्रकार जिल्हा वरिष्ठ पदाधिकारी यांना सांगितला आहे. असे निवेदनात राणे यांनी म्हटले आहे. पार पडलेल्या बैठकीत मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. पाटणकर यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे भविष्यात पक्षाला फटका बसेल. यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी असे अशोक राणे यांनी श्री पटोले यांनी म्हटले आहे.












