चिपळूण (प्रतिनिधी) : भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या युवा शक्ती जागर यात्रेचे आज उक्ताड, ता. चिपळूण येथे आगमन झाले. यावेळी भाजपाचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत करून यात्रेस शुभेच्छा दिल्या. तसेच संघटनात्मक बांधणीमध्ये आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत, असा विश्वास दिला.
यानंतर शहरातील मार्कंडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. तसेच शहरातील बहादूरशेख नाका येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे नेते वैभव खेडेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, शहर सरचिटणीस सारिका भावे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष शुभम पिसे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शितल रानडे, शहर अध्यक्ष रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












