रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे ठरल्याप्रमाणे कोकण रेल्वे स्थानकात दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी उपोषण करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तानी केलेला आहे. कोकण रेल्वेकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती असे असताना कोकण रेल्वेकडे कवडीमोल दराने जमिनी दिल्या होत्या. काय चालय काय? स्वतःहून अधिकारी यांनी प्रकल्प्रस्तांकडे लक्ष देणे गरजेचे होते. कोकण रेल्वे कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने चालविली जात असून त्यांना मॅन पॉवरची गरज असून सुध्दा भरती करत नाहीत.
गेल्या वर्षी रत्नागिरी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक श्री. कांबळे साहेब, सीपीओ श्री. अनुराग मेश्राम यांचे समवेत बैठक झाली होती. त्यांनी स्वतः शब्द दिला होता व आश्वासन दिले होते असे असूनही सुध्दा प्रकल्पग्रस्तांकडे मुद्दामहुन दुर्लक्ष केले आहे. म्हणून अधिकारी यांच्या विरोधात प्रकल्प ग्रस्तांना नोकरीत सामावून न घेत असल्याने प्रकल्पग्रस्तांनी जाहिर उपोषण करण्याचे ठरविले असून सदर उपोषणाच्या वेळी प्रश्न न सुटल्यास पुढील पंधरा दिवसात रेले रोको करण्याचा निर्धार सर्व प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे.
तरी तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त यांनी मंगळवार दि. २७ /०२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता येण्याचे श्री. संतोष पांडूरंग चव्हाण व उपाध्यक्ष श्री. संदिप आंब्रे – ८७८८६१४९४१ व कार्याध्यक्ष श्री. विनायक मुकादम – ९९२१४३५३७८ यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष चव्हाण यांना ९४२१५९९९१८ ह्या नंबर संपर्क करवा असे आवाहन करण्यात आले आहे.









