राजापूर (प्रतिनिधी): केंद्र सरकारने सन २०२६-२७ या वर्षाच्या बजेटमध्ये कोकणातील काजू आणि कोको या पिकासाठी समर्पित अशी योजना लागू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणी करता देश भरातील काजू आणि कोको पिकाचे प्रगतीशील शेतकरी, शास्त्रज्ञ, महामंडळ यांचे अध्यक्ष, अपेडाचे अध्यक्ष, तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांची परिषद अर्थ मंत्रालयाने आयोजित केली आहे. या मध्ये महाराष्ट्र राज्यातुन राजापूर तालुक्यातील प्रगतीशील काजू उत्पादक आणि प्रक्रियाधारक शेतकरी म्हणून डॉ. शैलेश शिंदे देसाई यांची निवड झाली आहे. तसे डॉ. शिंदे यांना केंद्र शासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
भारत हा काजू आणि कोको या पिकाच्या उत्पादनात जगामध्ये प्रमुख देश बनला पाहिजे असा महत्वाकांशी उद्देश या योजनेचा आहे. सध्याचे भारतातील काजू उत्पादन चांगले असले तरी आपल्याला जगातील इतर देशाकडून काजू आयात करावा लागतो. या मध्ये भारताचे परकीय चलन मोठयाप्रमावर खर्च होते ते वाचविणे, काजू कोको ची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच या पिकावरील प्रक्रिया यंत्रणाचे आधुनिकीकरण करणे आणि त्यासाठी स्थानिकस्तरावर प्रक्रिया केंद्र उभारणे, यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आणि यातून भारताला सन २०३० पर्यंत काजू आणि कोको मध्ये जगात प्रमुख देश बनविणे हा आहे.
या योजनेच्या अंमलबजावणी करता देश भरातील काजू आणि कोको पिकाचे प्रगतीशील शेतकरी, शास्त्रज्ञ,महामंडळ यांचे अध्यक्ष, अपेडाचे अध्यक्ष, तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ् या ची परिषद अर्थ मंत्रालयाने आयोजित केली आहे. या मध्ये महाराष्ट्रातुन राजापूर तालुक्यातील प्रगतीशील काजू उत्पादक आणि प्रक्रियाधारक शेतकरी म्हणून डॉ. शैलेश शिंदे देसाई यांची निवड झाल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. याबद्दल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी आणि काजू प्रक्रियाधारकांनी आनंद व्यक्त केला आहे.
डॉ. शैलेंद शिंदे हे हे ओणी येथील रहिवाशी असून एक प्रगतशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे. काजूच्या शेतीमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
Home महत्वाच्या बातम्या देशातील काजू आणि कोको पिकाच्या केंद्रीय स्तरावरिल परिषदेसाठी महाराष्ट्रातुन ओणीतील प्रगतीशील शेतकरी...












