लांजा (प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावर वेरळ गावी वसलेल्या श्री साईबाबा मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा हा सोमवार दिनांक २० मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
वेरळ येथील श्री साईबाबा मंदिर समितीच्या वतीने या साईबाबा मंदिराचा तृतीय वर्धापनदिन
सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने सकाळी नऊ वाजता साईबाबांची पूजा, अभिषेक सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ ते १२.३० महाआरती, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हळदी कुंकू समारंभ पार पडणार आहे.रात्री ७ ते ८ भव्य दीपोत्सव आठ ते नऊ सुस्वर भजन( दिनेश जठर बुवा आणि कुटुंबिय केळंबे), रात्री नऊ वाजता लकी ड्रॉ आणि रात्री १० वाजता बहुरंगी नमनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा मंदिर समिती वेरळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.










